Tue. Nov 24th, 2020

भाजपा, आरएसएसवर लालूप्रसाद यादवांनी साधला निशाणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला. एवढंच नाही तर लालूप्रसाद यांच्या घरावर तसंच कार्यालयासह 12 ठिकाणांवर सीबीआयनं

छापे टाकले आहेत.

 

लालूप्रसाद रेल्वेमंत्री असतानाचं हे प्रकऱण आहे. 2006 मध्ये रांची आणि पुरी इथल्या हॉटेल्सच्या देखभालीसाठी निविदा काढताना अनियमितता केल्याच्या आरोपाखाली

हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

IRCTC च्या हॉटेल्सची कंत्राट देतानाचं हे प्रकऱण आहे. लालू प्रसाद यादव यांनी हॉटेल भाडेपट्टयावर देण्याच्या मोबदल्यात जमीन घेतली. असा आरोप सीबीआयने केला

आहे.

 

लालूंसह त्यांची पत्नी राबडी देवी, त्यांचा मुलगा तसंच IRCTC च्या माजी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लालूंच्या निवासस्थानासह

दिल्ली, पाटणा, रांची, पुरी आणि गुरगाव इथं छापेमारीची कारवाई करण्यात आली.

 

लालू यांनी रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळात 32 कोटींची जमीन जवळपास 65 लाख रुपयांना विकत घेत.

 

या व्यवहारांच्या माध्यमातून स्वतःच्या खासगी कंपन्यांना फायदा पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

 

या कारवाईनंतर लालूप्रसाद यादव यांनी भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. भाजपानं माझ्याविरोधात कट रचला आहे, पण तरीही मी घाबरणार नाही,

असं मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केले.

 

मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण लक्ष्य केलं जाते. भाजपा आणि आरएसएस मला बदनाम करण्याचा कट रचतात. दबाव टाकून भाजपाला मला झुकवायचं

आहे.

 

मात्र, मी कधीही कोणासमोर झुकणार नाही आणि मी यांना घाबरणारसुद्धा नाही. आम्ही मातीमोल झालो तरी चालेल, मात्र भाजपा सरकारला सत्तेपासून दूर केल्याशिवाय

स्वस्थ बसणार नाही असा पलटवार लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *