Sat. May 15th, 2021

ऑस्ट्रियामधे दहशतवादी हल्ला

रात्री 8 च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली,6 वेगवेगळ्या शहरात घडली ही घटना…

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामधे दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमधे अंदाधुंद गोळीबार झाल्याने या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील पोलीस विभागाच्या माहितीनुसार रात्री 8 च्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली होती तसेच काही संशयितांना रिफल्सने हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही घटना शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे. या हल्ल्यात बरेच जण जखमी झाले आहेत. त्यात एक पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे तर पोलिसांनी लोकांना या हल्ल्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे.

पोलिसांनी या घटनेची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ठार मारण्यात यश आलेले आहे तर पोलिसांतर्फे गोळीबार झालेल्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये,सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करू नये,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यापासून दूर राहा असंही म्हणण्यात आलं आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *