Tue. Nov 24th, 2020

आज पुन्हा रखडली मुंबईकरांची लाईफलाईन

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली मध्य रेल्वे आज पुन्हा रखडल्याचे चित्र दिसून आले. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेले आहेत. यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे.

रेल्वे रखडल्याने नोकरीवर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले असून चाकरमानी रेल्वेतून उतरून रूळावरून चालत जात आहेत.

त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र संताप निर्माण होत आहे. रूळाला गेलेले तडे मोठे असल्याने दुरूस्तीला विलंब होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.

या पार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासन रेल्वे रूळ दुरूस्त करून पुन्हा रेल्वे सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच रुळाच्या कामाला किमान एक ते दीड तास लागणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *