Sat. Oct 24th, 2020

फिफा अंडर 17 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला जेतेपद

 

वृतसंस्था, नवी दिल्ली

फिफाच्या 17 वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद पटकावलंय. कोलकात्याच्या विवेकानंद युवा भारती स्टेडियममध्ये या स्पर्धेची फायनल मॅच पार पडली. यावेळी इंग्लंडने 5-2 अशा फरकाने स्पेनचा धुव्वा उडवला. आणि पहिल्यांदाच अंडर 17 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये इंग्लंडने आक्रमक खेळ करत विजय मिळवला. तर, स्पेनला चौथ्यांदा अंतिम फेरी गाठल्यानंतरही ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *