Fri. Oct 2nd, 2020

हळदीच्या कार्यक्रमात उशिरापर्यंत डीजे, पोलिस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईतील हळदीच्या कार्यक्रमात पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोपर खैराणेमध्ये हा प्रकार घडला. रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना तीन वाजेपर्यंत डीजे सुरु होता.

 

डीजे जप्त करायला गेलेल्या पोलिसांची नागरिकांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे लाठीचार्ज करावा लागल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं. या घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *