Mon. Jan 17th, 2022

शाहीनबागच्या मतदारसंघात ‘हा’ पक्ष आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष सध्या आघाडीवर आहे. तर भाजपच्या टक्केवारी वाढ होताना दिसतेय. तरीही AAP 56 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 14 जागांवर. मात्र शाहीनबाग मतदारसंघातील कल मात्र वेगळाच आहे.

काय आहे शाहीनबागचा कल?

दिल्लीत शाहीनबाग परिसरात CAA आणि NRC विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू होती.

शाहीनबाग ओखला मतदारसंघात येतं. हा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे.

गेल्यावेळी या मतदारसंघातून आपचे अमनतुल्लाह खान विजयी झाले होते.

यंदाही तेच या मतदारसंघातून उभे आहेत. मात्र यावेळी भाजपच्या उमेदवाराने या मतदारसंघात आघाडी घेतली आहे.

काँग्रेस आणि आपमध्ये मतांचं विभाजन झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाल्याचं बोललं जातंय.

शाहीनबाग आंदोलनामुळे राष्ट्रवादाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. सध्या तरी मतदारांनी या मतदारसंघात या मुद्द्यावर मतदान केल्याचं दिसत आहे.

तरीही भाजप आणि आप यांच्या टक्करीत काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झाल्याचं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *