Whatsapp groups च्या Admins साठी पोलिसांचं ‘हे’ पत्रक

कोरोनाच्या संसर्गाहूनही अधिक वेगाने कोरोनासंदर्भातील अफवा पसरत आहेत. लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर कोरोनासंदर्भात अफवा पसरण्यावर पोलीस नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी पोलिसांनी पत्रक काढलं आहे. या पत्रकानुसार Whatsapp ग्रुपवर जर कोरोनासंबंधी फेक मेसेज व्हायरल केल्यास ग्रुप अॅडमिन यासाठी जबाबदार धरले जातील. त्यांचावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मुंबई पोलिसांनी हे पत्रक काढलं आहे. यानुसार १० एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत हे पत्रक लागू असेल.
फेक मेसेजेस, अफवा पसरवू नयेत, यासाठी Whatsapp, Twitter, Facebook, TikTok, Instagram यांसारख्या सोशल साईट्ससाठीदेखील हे निर्बंध असतील.
केवळ कोरोनाच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजेसवरही पोलीस आता लक्ष ठेवून असतील. Whatsapp ग्रुपमधील कोणताही सदस्य जर कोरोनासंदर्भात अफवा पसरवत असेल, तर त्यासाठी Group admins जबाबदार धरले जातील. यासाठी Whatsapp groups हे केवळ Admins only करावेत, असंही सुचवलं आहे.