Tue. Oct 27th, 2020

मुंबईच्या लाईफलाईने 18 दिवसांत घेतलेल्या बळींची संख्या धक्कादायक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली उपनगरीय रेल्वे सेवा मुंबईकरांसाठी डेथलाईन ठरू लागली आहे. गेल्या 18 दिवसांत पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील अपघाती मृत्यूंची संख्या 177 वर पोहोचली आहे.

 

गुरुवारी तर या तिन्ही मार्गांवर 12 जणांनी जीव गमावले असून, 13 जखमी झाले. याआधी गेल्या रविवारी विविध अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

 

अपघाती मृत्यू रोखण्याकरता रेल्वेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना फोल ठरत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *