Tue. Oct 19th, 2021

मुंबईमध्ये लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू

मुंबईतील मुलुंडमध्ये नुकतीच लिफ्ट दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलुंड पूर्वेकडील रिचा टॉवर या इमारतीत झालेल्या लिफ्ट दुर्घटनेमध्ये तीन जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. तर लिफ्टच्या वरच्या भागात अडकलेल्या संजय यादव या लिफ्ट टेक्निशियनचा लिफ्ट आणि भिंतीच्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळी अकराच्या दरम्यान लिफ्टच्या दुरुस्तीसाठी इमारतीचे दोन रहिवासी आणि लिफ्टचा एक टेक्निशियन तेराव्या मजल्यावर या लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होते. एक कर्मचारी हा लिफ्टच्या वरच्या भागात काम करत होता त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाली आणि वरील कर्मचारी हा लिफ्ट आणि भिंतीच्या पॅसेजमध्ये अडकला.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. तर लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये अडकलेल्या सुपरवायझरचा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आला.

लिफ्टच्या दुरावस्थे संदर्भात वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. परंतु तरीदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ही घटना घडल्याचं स्थानिकांचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *