Mon. Jan 24th, 2022

‘अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचे कारस्थान सुरू’ – नवाब मलिक

‘गेल्या दोन महिन्यांपासून मी काही प्रकरण उघड केली आहेत. तेव्हापासून माझ्यावर काही लोक पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरोधात मी लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे,’ असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

‘राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सारखेच माझ्या विरोधातही कट रचण्यात येत असल्याचे मलिकांनी सांगितले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात येत्या दिवसांत तक्रार करणार असल्याचे,’ नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराची रेकी करण्यात येत असल्याबाबतची माहिती दिली. ‘काही पक्षाचे कार्यकर्ते, काही व्यक्ती आमच्या घराची, ऑफिसची माहिती काढत आहेत. घरातील मुले, माझे नातू कोणत्या शाळेत शिकतात त्याचा शोध घेत आहेत. मागील आठवड्यात मी दुबईत असताना दोन अज्ञात व्यक्ती कॅमेरा घेऊन माझ्या घराच्या बाहेर फोटो काढत होते. फोटो काढत असताना या दोन व्यक्तींना परिसरातील इतर नागरिकांनी अडवले. त्यावेळी ते ते दोघे तेथून पळून गेले. परंतु त्यांना टिळक टर्मिनस येथे अडवण्यात आले. आम्हाला पकडले जाऊ शकते म्हणून तेथून घाबरून पळ काढला असल्याचे या दोघांनी सांगितले,’ असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *