Thu. Jan 28th, 2021

शेतकऱ्यांची थट्टा, SMS कर्जमुक्तीचा, लिंक Candy Crush ची

शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देणाऱ्या मेसेजमध्ये चक्क गेम्सच्या वेबसाईट उघडणाऱ्या लिंक्स पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप होतोय.

काय आहे हा प्रकार?

सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती देणारा एक मेसेज VZ- KISSAN या SMS पोर्टल वरून शेतकऱ्यांना पाठविण्यात आला आहे.

मात्र दिलेल्या या माहिती पोर्टलवर चक्क गेम अपलोड करण्यात आले आहेत.

या योजनेची माहिती देण्यासाठी शासनाने ही साईट तयार असली तरी यावर कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

मात्र ही लिंक ओपन करताच ‘कॅन्डी क्रश’ (Candy Crush), ‘डायमंड डायरीज सागा’ (Diamond Diaries Saga) असे गेम ओपन होत आहेत.

शेतकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टिका शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *