Thu. Mar 4th, 2021

Lock Down : अर्थमंत्र्यांकडून 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे रस्तावर राहणाऱ्यांचे तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाण्या-पिण्याचे हाल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशातील जनतेला दिलासा दिला आहे. अर्थमंत्री आणि अनुराग ठाकूर पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत अनेक घोषणा केल्या. या पत्रकार परिषदेत विविध वयोगटातील लोकांसाठी घोषणा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांसाठी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी देखील घोषणा केली गेली.

  • प्रंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ ८० कोटी भारतीयांना होणार आहे. पुढील तीन महिने प्रत्येक व्यक्तीला 5 किलो जास्तीचे गहू आणि तांदूळ मोफत देणार. तसेच प्रत्येक 1 किलो डाळदेखील मोफत मिळणार.
  • उज्जवला योजनेनुसार ज्या महिलांना गॅस जोडणी मिळाली आहे. त्यांना पुढील ३ महिने मोफत गॅस सिलेंडर मिळणार. यामुळे एकूण ८ कोटी महिलांना लाभ होणार.
  • शेतकरी, मनरेगा कामगार, विधवा, दिव्यांग, जनधन खाती असलेल्या महिला, उज्ज्वला योजनेचे लाभार्थी, बांधकाम कामगार, इत्यादींच्या खात्यात थेट मदत देणार असल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा
  • अर्थमंत्र्यांनी देशामधील गरिब वर्गासाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. कोणाही उपाशी राहता कामा नये, यासाठी ही मदत देण्यात येणार आहे. बॅंक खात्यामध्ये रक्कम देण्यात येईल.
  • वयोवृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना अतिरिक्त १ हजारा रुपयांची मदत केली जाणार.
  • पुढील ३ महिने दोन टप्प्यांमध्ये मदत दिली जाणार.
  • वरील वर्गातील लोकांना मदत ही थेट खात्यात पाठवली जाणार.
  • यामुळे एकूण ३ कोटी लोकांना लाभ होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *