लॉकडाऊनमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिरा?

लॉकडाऊनचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही झाला आहे. राज्य सरकारने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केला आहे. लॉकडाऊनमुळे पेपर शिक्षकांपर्यंत पोहोलचलेले नाहीत. त्यामुळे निकाल वेळेत येऊ शकत नाही, असं सांगण्यात येतंय. याशिवाय अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा पेपरचं मूल्यमापन झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे पेपरचे गठ्ठे अजूनही नियंत्रण कक्षात तसंच पडून आहे. राज्यातला लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे पेपरच्या मूल्यांकडनाचं काम अजून खोळंबण्याची शक्यता आहे. परीक्षकांकडून हे पेपर नंतर पेपर नियामकांकडे जातात, त्यानंतर मुख्य नियामकांकडे जातात. मात्र पेपर अजून नियंत्रण कक्षातच असल्यामुळे पुढील प्रक्रिया कधी होईल, याबद्दल कोणतीच खात्री नाही.