#Lockdown | दारुड्यांचा बारवर डल्ला, पण फोडला नाही गल्ला

प्रातिनिधिक छायाचित्र
कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकानं बंद आहेत.
लॉकडाऊनच्या निर्णयामुळे तळीरामांची चांगलीच गैरसौय झाली आहे. दररोज पिणाऱ्यांची तर अवस्था वाईट झाली आहे. लॉकडाऊनचा एक एक दिवस तळीराम मोजतायेत. केव्हा लॉकडाऊन संपतोय, आणि तळप भागवतोय, असं प्रत्येक दारुड्याला वाटतंय. पण लॉकडाऊनचे दिवस निघता निघत नाहीयेत.
पण शांत बसतील ते दारुडे कसले. मग काय दोन दारुड्यांनी दारुची तळप मिटवण्यासाठी बारवर डल्लाच मारला राव. सदर घटना नागपुरातून समोर आली आहे.
वाईन शॉप २ तास सुरु ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे विनंती
नागपुरातील सुविधा बारवर या दारुड्यांनी डल्ला मारला. या बारच्या मागील बाजूची भिंत तोडली. भिंत तोडत बिअर बारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चक्क लाख रुपयांची दारु लंपास केली. हा सर्व प्रकार 31 मार्चचा आहे. चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या 2 चोरट्यांनी फक्त महागड्या ब्राँडची दारुच पोत्यात भरली.
या लॉकडाऊनच्या परिस्थितीत तळीरामांसाठी आधी दारु महत्वाची, मग ब्रॅंड. भावांनी दारु चोरली ती पण ब्रॅंडेड. ‘शॉक बडी चीज है’ हे वाक्य या 2 चोरट्यांनी सिद्ध करुन दाखवलं.
ब्राँडेड दारु चोरल्यानंतर भावांनी पळ काढला. पण या दोघांचं दुर्देव, सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.
प्रामाणिक चोर
या दोघांनी तळप भागवण्यासाठी बिअर बारवर डल्ला मारला. ब्राँडेड दारुदेखील चोरी केली. पण त्यांनी स्वतवरचा संयम शाबूत ठेवला. दारुशिवाय काहीच चोरायचं नाही, असंच या दोघांनी ठरवलेलं बहुतेक. कारण या दोघांनी दारुशिवाय बारमधील इतर कोणतीही वस्तू चोरली नाही. तसंच यांनी बारच्या गल्ल्यावरदेखील डल्ला मारला नाही.
दरम्यान या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.