Thu. Mar 4th, 2021

लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढला

१४ एप्रिलपर्यंत जाहीर केलेला लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता ३ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जे नियम गेले २१ दिवस देशवासियांनी पाळले, तेच ३ मे पर्यंत आता पाळायचे आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी लॉकडाऊनचं करत असलेल्या पालनाबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले.

 काय म्हणाले पंतप्रधान?

आपण इतर देशांच्या तुलनेत वेळेत लॉकडाऊन जाहीर केला आणि संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी देशात एकही कोरोनाबाधित नव्हता, त्यावेळीच आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं स्क्रीनिंग सुरू केलं होतं. देशात कोरोनाचे ५०० रुग्णही नसताना देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करून कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आपण जलदगतीने निर्णय घेतले नसते, तर परिस्थिती बिकट झाली असती.

२१ दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. त्यातून हा भारतात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवायचा निर्णय घेण्यात आला. हा लॉकडाऊन आणखी कडक असेल.

२० एप्रिल पर्यंत प्रत्येक राज्यांतील hotspots वर लक्ष देण्यात येईल. विविध ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येतील. मात्र जर त्यानंतर आवश्यक ती काळजी घेतलेली दिसली नाही, तर पुन्हा प्रतिबंध लावले जातील. १५ एप्रिल पर्यंत यासंदर्भात विस्तृत माहिती जाहीर होईल.

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने लॉकडाऊन महागात पडत असला, तरी देशवासियांच्या प्राणांचा विचार करता हे आर्थिक संकट नव्हेच.    

या काळात प्रत्येकाने आपआपली काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी. यासाठी ‘आरोग्य सेवा सेतू App’ डाऊनलोड करावं, असंही पंतप्रधानांनी सुचवलं आहे.  कुणालाही नोकरीवरून काढू नका. गरीबांची देखभाल करा. या संकटात जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि अतयावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांबद्दल आदर बाळगा, असं मोदींनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *