ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची घोषणा

पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं आहे. फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती त्यांनी जनतेला संबोधित करताना दिली आहे. स्कॉटलंडकडून करण्यात आलेल्या घोषणेनंतर बेरिस जॉन्सन यांनी ही घोषणा केली आहे.