Sat. Mar 6th, 2021

‘या’ राज्यात वाढवला लॉकडाऊन

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकआऊट जाहीर केला. त्यानंतरही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे काही राज्यांत लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. ओदिशा राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. आहे. लॉकडाऊन वाढवणारं ओदिशा हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.   

लॉकडाऊन संदर्भात पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्याशी तसंच सर्वपक्षीय नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याविषयी सरकार विचार करत आहे. मात्र ओदिशा सरकारने आधीच आपल्या राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन संपायला आता आठवडाही शिल्लक नाही. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अजूनही वाढच होतेय. महराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, झारखंड सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सर्व परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही. ओदिशाने मात्र तात्काळ निर्णय घेत लॉकडाऊन वाढवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *