Thu. Dec 2nd, 2021

फॅन्सना सांगा, ‘अपना टाइम आ गया’, मोदींनी ‘या’ सेलिब्रिटींना केलं आवाहन

लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या असून एका महिन्यापेक्षा कमी काळ राहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये रणवीर सिंह, वरुण धवन, विकी कौशल या अभिनेत्यांना टॅग करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच अनेक अभिनेत्यांना त्यांनी टॅग केलं आहे. या अभिनेत्यांच्या सिनेमातील हिट ठरलेले डायलॉग्सदेखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये वापरले आहेत.

‘देशातील तरुण वर्ग तुमचा चाहता आहे. त्यामुळे रणवीर सिंह, वरुण धवन आणि विकी कौशल आता, या तरुणाईला ‘अपना टाइम आ गया है’ सांगण्याची आणि जवळच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाच्या दिवशी आपल्यातील ‘जोश’ दाखवायची वेळ आली आहे हे कळवण्याची वेळ आली आहे.’ असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्लॉगद्वारे जनतेला आवाहन केलं आहे.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मायावती यांच्यासह अनेक दिग्गज आणि तरुण नेत्यांनाही टॅग केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *