Tue. Oct 15th, 2019

Loksabha Election 2019 : मुंबईत भाजप-शिवसेनेच्या यशाचं कारण काय?

मुंबईत सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीला जोरदार फटका बसला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठी खूप मोठी संधी असून देखील काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष , कमकुवत संघटन आणि अर्थातच नरेंद्र मोदींचा वाढलेला प्रभाव हा आघाडीच्या अपयशाला कारणीभूत ठरला आहे. काँग्रेसचा परंपरागत मुस्लिम मतदार हा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने उभा झालेला दिसला नाही. किंवा तो मतदान केंद्रापर्यंत पोहोचू दिला नाही असाही आरोप केला गेला.

भाजपला शहरी मतदारांचा मोठ्या प्रमाणात असलेला पाठिंबा हा मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्यावी यासाठी होता अस दिसून आलं आहे.
मात्र मोदींची जी महाप्रतिमा तयार करण्यात आली होती आणि शिवाय महाप्रचंड असा प्रचारही मजबूत संघटनेच्या ताकदीवर करण्यात आला त्याचाही खूप फायदा भाजपला झाला आहे.

मोदींच्या तुलनेमध्ये राहुल गांधी यांच नेतृत्व हे या निवडणुकीत प्रभावी ठरू शकल नाही. याशिवाय सरकारी योजनांचे लाभार्थी हे भाजपचे मतदार व्हावे म्हणून भाजपन केलेले जोरदार प्रयत्न यशस्वी झालेले दिसून येत आहे. भाजप सोबत शिवसेनेला मागच्या निवडणुकी सारखाच याही वेळी मोठा फायदा झाला आहे..त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सेनेची जागावाटपात बार्गेनिंग पॉवर ही कमी करण्यात भाजपला आताच यश मिळालं अस म्हणता येईल..

राज ठाकरे मोदी शाह यांच्या विरोधात मैदानात ताकदीने उभे झाले असले तरी त्यांचा प्रभाव हा युतीला मुंबईत यशापासून रोखू शकला नाही अर्थात शरद पवार यांच्या युक्तिवादा प्रमाणे विधानसभेचे निवडणुकीचे गणित हे खूप वेगळे राहणार आहे…मात्र ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या जागी धडाडीने काम करणाऱ्या नव्या नेत्याला येत्या काळात ताकद द्यावी लागणार आहे ..

वंचित बहुजन आघाडी चा आणि इतर पक्षांचा प्रभाव मुंबईत फार दिसला नाही त्यामुळे आघाडी आणि युती मध्येच प्रामुख्याने लढत पाहायला मिळाली…

मिलिंद देवरा आणि प्रिया दत्त यांनी शेवटच्या क्षणी कसलेली कंबर ही काँग्रेसला यश संपादन करून देवू शकली नाही याचाच अर्थ वेळेवर निवडणूक लढण्याचा दोघांचाही निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे अर्थात ही पक्ष नेत्याची ही चूक ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *