Wed. Jan 19th, 2022

मतदानावेळी कमळाची साडी नेसणं सांगलीच्या महापौरांना पडलं महागात

23 एप्रिलला महाराष्ट्रात 14 मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. सांगलीत भाजपाकडून संजय पाटील आघाडीचे विशाल पाटील तसेचं वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. सांगली महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. सांगलीच्या भाजपाच्या महापौर संगीता खोत यांनी मतदानासाठी कमळाची साडी परिधान केली होती. यामुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक विभागाकडून महापौर संगीता खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील महात्मा गांधी पोलीस चौकीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसचे नेते अय्याज नायकवडी यांनी आक्षेप घेत जोरदार वादावादी करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तर महापौर संगीता खोत यांनी दादागिरीची भाषा करून कुठेही तक्रार करा अशी धमकी दिली होती.

कमळाची साडी पडली महागात

23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात सांगलीतही मतदान झाले आहे.

सांगली लोकसभा मतदार संघासाठी सरासरी 62 ते 65 टक्के मतदानाची नोंद झाली.

मतदाना दरम्यान सांगली जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

परंतु कमळाची साडी परिधान केल्याने महापौर संगीता खोत चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.

काँग्रेसचे नेते अय्याज नायकवडी यांनी आक्षेप घेत जोरदार वादावादी करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

महापौर संगीता खोत यांनी दादागिरीची भाषा करून कुठेही तक्रार करा अशी धमकी दिली होती.

काँग्रेसच्या नेत्यांनी आयोगाकडे तक्रार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदारांना प्रभावित केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.

निवडणूक विभागाकडून महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *