रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं लोणार सरोवर
आदित्य ठाकरे यांनी या सरोवराची दोन छायाचित्र ट्विट करुन दिली माहिती…

बुलढाणा मधील लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
‘मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते. कुणालाही आकर्षित करेल असेच ते दृश्य होतं. जैवविविधता आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्व आहे’ असंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. रामसर पाणथळ क्षेत्र घोषित झाल्यानं लोणार सरोवराच्या प्रसिद्धीत जागतिक पातळीवर भर पडणार आहे. शिवाय याठिकाणी अनेक पर्यटक येतील त्यामुळे याठिकाणी रोजगार निर्मीत होईल असा देखील फायदा याद्वारे होईल.
मला सांगताना आनंद होत आहे की, लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले होते, सर्वांना आकर्षित करेल असे ते दृश्य होते. जैवविविधता, पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 13, 2020
छायाचित्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी pic.twitter.com/kvSogAVrxO
आदित्य ठाकरे यांनी या सरोवराची दोन छायाचित्र ट्विट करुन ही माहिती दिली आहे. तसेचं लोणार सरोवराचे फोटो हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेले आहेत. लोणार सरोवर ३६५.१६ हेक्टर परिसराच्या क्षेत्र आहे आणि ७७.६९ हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे हे सरोवार आहे. लोणार सरोवराच फोटो मोहात पडणारे आहे या सरोवराला अनेक लोक भेट देतात.