Sat. Apr 17th, 2021

हरवलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याला पालघर रेल्वे पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथून हरवलेल्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्याला सुखरूप आपल्या आई-वडिलांना ताब्यात देण्यात पालघर रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.

उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथून हरवलेल्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्याला सुखरूप आपल्या आई-वडिलांना ताब्यात देण्यात पालघर रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. 29 जून रोजी उत्तर प्रदेश येथील मूळगाव रामपूर, जिल्हा फैजाबाद येथून हरवलेल्या संदीप कुमार 7 वर्षीय चिमुकल्याला पालघर रेल्वे पोलिसांनी सुखरूप त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केले आहे.

नेमकं काय घडलं?

पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर 1 जुलै रोजी एक 7 वर्षाचा चिमुकला रेल्वे पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी रेल्वे स्थानकात आजूबाजूला त्याचे पालक आणि नातेवाईकांचा शोध घेतला असता चिमुकला एकटा असल्याचं आढळून आला. त्याला पालघर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हा चिमुकला भाषेच्या अडचणीमुळे फक्त आपले नाव ‘संदीप’ आणि ‘रामपूर’ इतकेच बोलत होता. मात्र तब्बल 7 दिवसानंतर स्थानिक दुभाषिककडून भोजपुरी भाषेत चिमुकल्याकडून त्याच्या घरचा पत्ता, आई-वाडीलांबाबत विचारणा केली.

या चौकशीत उत्तर प्रदेशातील बालकल्याण समिती मार्फत स्थानिकांशी संपर्क साधून पोलिसांनी या चिमुकल्याच्या पालकांचा शोध लावला. आणि त्यांना आपला मुलगा पालघर येथे सुखरूप असल्याचे कळवले.

पालक आणि मुलाची ओळख पटल्यानंतर बालकल्याण समिती पालघर यांच्यासमोर पोलिसांनी चिमुकल्याला सुखरुप आईवडिलांकडे सुपूर्द केले.

मुंबईला जाऊन आपल्याला काम मिळेल असे सांगत त्याच्यापेक्षा एक थोरला आणी 7 वर्षाचा संदीप असे हे दोघेजण रेल्वेने मुंबईकडे निघाले होते. मात्र रेल्वेचा प्रवास त्यांच्यासाठी अज्ञात असल्याने त्यांची दिशाभूल झाली असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *