Mon. Dec 6th, 2021

रासप नेते महादेव जानकरांकडून शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटी कर्ज घेतल्याचा आरोप असणाऱ्या गुट्टेची पाठराखण

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटणाऱ्या रत्नाकर गुट्टेची मत्स्य,दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकरांनी पाठराखण केली. रत्नाकर गुट्टे हा रासपचाच कार्यकर्ता असल्याचंही जानकरांनी कबुल केलं. 6 जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावानं गुट्टेंनी 328 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे.

 

बोगस कागदपत्र जोडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेचं कर्ज मिळणं शक्य नाही. पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन गुट्टेंनी हे कर्ज मिळवल्याचं उघडकीस आलं होतं.

 

गुट्टेंविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशीही केली होती. पण गुट्टेंनी काही शेतकऱ्यांच्या नावे काढलेले पैसे परत भरल्याचंही जानकरांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *