Sat. Jan 22nd, 2022

विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून

कोरना व्हायरसचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. कोरोना व्हायरसमुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुरु असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं आहे.

विधिमंडळाच्या हे अर्थसंकल्पीय अधिवेशषन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आलं. विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरु झालं होतं. ६ मार्चला राज्याचं अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज एकूण महिनाभर चालणार होतं. परंतु कोरना व्हायरसमुळे हे कामकाज गुंडाळण्यात आलं आहे.

तसेच यावेळेस पुढील अधिवेशनाची घोषणा देखील करण्यात आली.

विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन हे २२ जूनपासून सुरु

आजी माजी आमदाराचं स्नेहमेळावा

विधानभवनातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील आजी माजी सदस्यांचा म्हणजेच आमदारांचा स्नेहमेळावा महाराष्ट्र दिन म्हणजेच १ मे रोजी आयोजित करण्यात यावा, याबाबतच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

दरम्यान विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची निवड करण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत.राज्य विधिमंडळाचे हिवाळी, अर्थसंकल्पीय आणि पावसाळी असे ३ अधिवेशन होणं अपेक्षित असतात. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे उपराजधानी असलेल्या नागपुरात होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *