मलंगगडाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार – एकनाथ शिंदे

मंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाचा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकास करणार, असं आश्वासन दिलं आहे. एकनाथ शिंदे शनिवारी मलंगगडावरील यात्रेसाठी आले होते. यावेळेस त्यांनी हे आश्वासन दिलं.
मलंगगड शहरापासून जवळ आहे. पंरतु मलंगगडावर जाण्यासाठी वाहतुकीची सोय नाही. त्यामुळे इथला अपेक्षित असा विकास झालेला नाही.
मलंगगडावर पर्यटकांचा ओघ वाढावा, यासाठी या ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रॉली आणि पाण्याची व्यवस्था या सोयी देण्यात येणार आहे. या सुविधा देण्यासाठी प्राधान्याने या परिसराचा विकास करणार असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या परिसराचादेखील विकास केला जाणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी एकनाथ शिंदेंच्या हस्ते मलंग मत्स्येंद्रनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांच्यासह हजारो शिवसैनिक आणि भाविक उपस्थित होते.