जिल्हा परिषद निवडणूक : गृहमंत्र्यांच्या पुत्राचा विजय

राज्यात एकूण 6 जिल्हा परिषदेचे कल समोर येत आहे. त्यामुळे सर्व चित्र स्पष्ट होत आहे.
नागपुरातून गृहमंत्र्यांच्या मुलाचा विजय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सलील देशमुखांनी विजयश्री मिळवली आहे. सलील देशमुख राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत.
सलील देशमुखांनी नागपुरातील मेटपांजरा येथून विजय मिळवला आहे. सलील देशमुखांनी पहिल्याच झटक्यात विजय मिळवला आहे.
तर दुसऱ्या बाजूला आदिवासी मंत्री के.सी.पाडवींच्या पत्नी हेमलता पाडवींचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराने हेमलता पाडवींचा पराभव केला आहे.
हेमलता पाडवी या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होत्या. तोरणमाळ गटातल्या शिवसेनेच्या गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींचा पराभव केला.