Thu. Jan 20th, 2022

आम्ही सत्तेसाठी लालची नसून जनतेच्या सोबत – जितेंद्र आव्हाड

देशाभरात सीएए कायदा लागू झाला आहे. यानंतर देखील या कायद्याला राज्यासह देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं करण्यात आली.

या सीएए कायद्यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भूमिका मांडली आहे.

संसदेने पारित केलेला कायदा प्रत्येक राज्याला लागू करणं बंधनकारक असतं. त्यामुळे राज्यतही कायदा लागू करावाच लागतो, मग महाराष्ट्र सरकार बरखास्त होऊ शकतं? असा प्रश्न आव्हाडांना विचारला.

आम्ही सत्तेसाठी लालची नाही. आम्ही जनतेच्या सोबत असल्याचे आव्हाड म्हणाले.

त्यामुळे सत्ता आली काय आणि गेली काय? कोण घाबरतोय? असा सवाल मंत्री आव्हाडांनी केला.

तसेच राज्यात सीएए कायदा लागू करणार नाही, अशी आक्रमक भूमिका आव्हाडांनी घेतली. आव्हाड पुण्यात बोलत होते.

पुण्यातील कोंढव्यात CAA विरोधात काही दिवसांपासून धरणं आंदोलन केलं जात आहे. जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन ठिकाणी सोमवारी रात्री या ठिकाणी भेट दिली.

तसेच आव्हडांनी भिवंडीत केंद्र सरकारवर सीएए कायद्यावरुन घणाघात केला. भिवंडीतील धामणकरनाक्यातील परशुराम टावरे स्टेडियममध्ये जाहीर सभेत ते बोलत होते.

दरम्यान या आधीही काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनीही CAA लागू करायला विरोध दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *