…म्हणून पक्षाचा झेंडा बदलला – राज ठाकरे

राज ठाकरेंनी गुरुवारी अधिवेशनात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
मनसे पक्षाचा झेंडा बदलणार का, याबद्दल गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. राज ठाकरेंनी गुरुवारी पक्षाच्या झेंड्या बद्दलही वक्तव्य केलं.
काय म्हणाले राज ठाकरे ?
मनसे पक्षाची २००६ साली स्थापना करण्यात आली. त्यावेळेस माझ्या मनात जो झेंडा होता, तो हा झेंडा असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
हा झेंडा जेव्हा माझ्या मनात होता. तेव्हा अनेक जण माझ्याकडे आले. अनेकांनी मला झेंड्याच्या रंगाबद्दल अनेक आयडीया दिल्या.
त्या वेळेस मी ३६-३७ वर्षांचा होतो. मागे कोणी नव्हतं, सांगायला कोणी नव्हतं. अनेक जण आले, अनेक गोष्टी सांगितल्या. आणि त्यात ही सर्व गोष्ट निश्चित झाली.
परंतु माझ्या डोक्यातून राजमुद्रा असलेला झेंडा जात नव्हता. पक्षाचा ध्वज बदलण्याबाबत गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात सुरु होता.
हा योगायोग आहे
मनसेने ध्वज बदलल्याने अनेक तर्क लावले जात आहेत. आताच्या परिस्थीतीमुळे ध्वज बदलला, असे तर्क लोकांकडून लावले जात आहेत.
मात्र तो योगायोग असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
शिवमुद्रा असलेला झेंडा आणयचा हे मी निश्चित केलं. मग कसा आणायचा, यासाठी मग अधिवेशनानिमित्ताने नवीन झेंड्याचं अनावरण केलं गेलं. असं राज ठाकरे म्हणाले.
आपला झेंडा शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. हा इतर कोणता झेंडा नाही.
हा ध्वज जेव्हा हातात घ्याल, तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडता कामा नाही, याची काळजी घ्या. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
पक्षासाठी २ झेंडे
राजमुद्रा आपली प्रेरणा आहे. त्यामुळे पक्षासाठी २ नवीन ध्वज आणले आहेत. राजमुद्रा असलेला आणि तसाच एक पक्षाचा निशाणीचा झेंडा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रा असलेला झेंडा वापरणार नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
ती राजमुद्रा आहे, आणि तिचा मान राखलाच गेला पाहिजे. त्यामुळे आताच सांगतोय, झेंड्याबद्दल गोंधळ होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले.
पक्षाचा झेंडा बदलण्याची पहिली वेळ नाही
मनसेने झेंडा बदलण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी जनसंघाने १९८० साली आपला झेंडा बदलला, नाव बदललं होता.
भारतीय जनता पार्टी करण्यात आलं, तेव्हा झेंडाही बदलण्यात आला होता.
कात टाकावी लागते, नवी उर्जा द्यावी लागते. सकारात्मक गोष्टीसाठी बदल हा आवश्यक असतो. गरजेचा असतो, असेही राज ठाकरे म्हणाले.