Sun. Oct 17th, 2021

एमपीएससीच्या संदर्भात महत्वाची बैठक

एमपीएससीकडे २०१९च्या प्रलंबित तीन परीक्षेतील मुलाखतीसाठी पात्र ६९९८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. २०१९ मधील दोन परीक्षांमधील 451 पदं आणि 2020 च्या आठ परीक्षांमधील ११४ पदे भरण्याची कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्वरित करणार आहे, अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार दिली.

यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीमध्ये काही बदल करता येईल का, यावर देखील विचार सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.काही दिवसांपूर्वीच स्वप्निल लोणकर या परीक्षार्थीने नैराश्यातून आत्महत्या केली होती. परीक्षा उत्तीर्ण होऊनही स्वप्नील लोणकर हा विद्यार्थी नोकरीपासून वंचित होता. त्यामुळे काही महिन्यांपासून एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी आंदोलन करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या संदर्भात महत्वाची बैठक होणार असून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *