विधानसभेत विरोधकांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

17 जून 2019 पासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये लोकप्रिय योजनांचा यात समावेश आहे. तर अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करीत विरोधकांनी केला सभात्याग देखील केला. परंतु विरोधक नसतानाही अर्थसंकल्पाचे वाचन सुरू होते. यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
अर्थ संकल्प फुटला नाही, नवीन डिजिटल माध्यमांचा उपयोग केला जात आहे.
अर्थ मंत्री अर्थसंकल्प सांगत आहेत आणि ट्विटरवर अर्थसंकल्पाची माहिती यामध्ये 15 मिनिटांचा फरक आहे.
विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारवर टीका करताना ट्विटरचा वापर करत असतात, मग ट्विटरवर अर्थसंकल्पाची माहिती दिल्यास काय चुकीचे आहे.
अर्थमंत्री अर्थसंकल्पाची माहिती देत असताना खाजगी न्यूज चॅनल्सवर सतत माहिती दिली जात आहे.
डिजीटल मिडियाच्या माध्यमावरही सतत माहिती दिली जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची शंका उपस्थित करु नये.
जे जे लोक सभागृहातून अर्थसंकल्पाच्या वेळी असे निघून जातील ते पुढच्या अर्थ संकल्पाला या सभागृहात नसतील अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.