महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढ सुरू
महाराष्ट्रात गुरुवारी ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत

महाराष्ट्रात गुरुवारी ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण १७ लाख ६३ हजार ५५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. ज्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या ७९ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रात आतापर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा कोरोनामुळे बाळी गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.