राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारी राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

महाराष्ट्रात बुधवारी राज्यात ४ हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात दिवसभरात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ५ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आत्तापर्यंत राज्यात एकूण १७ लाख ४२ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४५ टक्के इतका झाला आहे.