अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलावा १० नोव्हेंबरला
अनेकजण दाऊदची मालमत्ता घेण्यासाठी इच्छूक…

रत्नागिरी – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार असलेल्याची माहिती समोर आली आहे. हा लिलाव कोविडच्या संकटामुळे मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. लिलावच्या पुर्वी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी खेड येथे जाऊन दाऊद यांच्या मालमत्तेची पाहणी केली. या लिलावात बोलीधारक भाग घेणार आहेत, आणि हा लिलाव अधिकाऱ्यांसोबत उपस्थितीत होणार आहे. दाऊदच्या एकूण सात मालमत्तांचा लिलाव होणार आहे. दाऊद हा खेड तालुक्यातील मुंबकेमधील आहे.
या गावात त्यांच्यावेगवेगळ्या मालमत्ता आहेत. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहेत तर अनेकजण दाऊदची मालमत्ता घेण्यासाठी इच्छूक आहे असं अधिकऱ्यांनी म्हटलं आणि या लिलावात यशस्वी होऊ असा विश्वासही अधिकऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा लिलाव १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.