राजेश टोपे यांना केलं नव्या कोरोनावर टि्वट

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. भारतसह अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली.“ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे” असे राजेश टोपे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. शिवाय कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर ३८ लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली असून नवा कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला होता, जो पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.