Tue. Mar 9th, 2021

70 हजार ३९९ बेघर कामगारांसाठी राज्य सरकारतर्फे २६२ रिलीफ कॅम्प

महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर प्रत्येकाने घरातच थांबावं असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे. लोकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना वगळलं. तसंच किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच हॉटेल्सची किचन्स सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ घरपोच मिळण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मात्र बाहेरच्या राज्यातून आलेले मात्र इथे राहण्याची सोय नसलेल्या हजारो कामगारांचा प्रश्न मात्र अजून तसाच राहिला. असंघटित क्षेत्रातले कर्मचारीदेखील अकून पडले आहेत. या लोकांच्या निवाऱ्याची तशीच अन्नपाण्याची व्यवस्था नसल्याने यांचा प्रश्न गंभीर आहे.

अशावेळी राज्य सरकारने महाराष्ट्रात २६२ रिलीफ कँपची उभारणी केली आहे. यामध्ये ७० हजार ३९९ कामगारांची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रात अडकून पडलेल्या राज्याबाहेरील कामगारांचा प्रश्न गंभीर होता. या लोकांच्या राहण्याची समस्या मोठी होती. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने तसंच लॉकडाऊनदरम्यान राहण्याची सोय नसल्याने हे कामगार अवैधरीत्या आपआपल्या राज्यात पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले. ट्रक, दुधाचे टेम्पो यांच्या मदतीने हे कामगार महाराष्ट्रातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. मात्र यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती जास्त होती. त्यामुळे सरकारने ताबडतोब या प्रकरणात लक्ष घालत त्यांच्यासाठी रिलीफ कँपची सोय केली आहे. CMO च्या अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

‘महाराष्ट्र सरकारने राज्यभरात २६२ रिलीफ कॅम्पची सोय केली आहे. राज्यातल्या ७०,३९९ स्थलांतरीत कामगार, बेघर गरीबांसाठी सोय होणार आहे. येथे अन्नपाण्याची सोय होणार आहे.’ असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *