Corona : राज्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू, रुग्णांचा एकूण आकडा 74

राज्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. कोरोनाग्रस्त असलेल्या 56 वर्षीय रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या आकड्यात देखील वाढ झाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यात रविवारी सकाळी 11 पर्यंत 10ने वाढ झाली आहे.
राज्यात नव्याने 10 रुग्ण वाढले आहेत. यापैकी 6 नवे रुग्ण मुंबईत आहेत. तर 4 रुग्ण हे पुण्यातील आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा हा एकूण 74 वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा हा शनिवारी रात्रीपर्यंत 64 इतका होता.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कडेकोटपणे जनता कर्फ्यु पाळला जात आहे.