30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊन १४ एप्रिलनंतरही कायम राहाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. हा लॉकडाऊन १६ दिवस वाढवण्यात आला असून ३० एप्रिलपर्यंत सुरूच राहील. ३० एप्रिलनंतर लॉकडाऊन संपणार, याची खात्री मुख्यमंत्र्यांनी दिली नाही.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता आपण कोरोना रुग्ण समोरून येऊन चाचणी करण्याची वाट न पाहता त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्यात. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. यांतील १००० रुग्ण कोरोनाग्रास्त आढळले.
या प्रसंगी नागरिकांनी शिस्त पाळल्यास ल़कडाऊन लवकर संपेल. यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे याच्या सूचना लवकरच देण्यात येतील.