दहावी बारावी अनुत्तीर्णांसाठी पुन्हा परीक्षेची संधी
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची पुन्हा संधी…

दहावी बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुन:परीक्षा द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 20 ऑक्टोबर 2020 ते 29 ऑक्टोबर 2020 या दरम्यान परीक्षा अर्ज भरायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत परीक्षा अर्ज भरता येणार नाहीत अशांना 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2020 या काळात परीक्षा अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी मिळावी यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या श्रेणीत सुधारणा करायची आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्दा अर्ज करण्यात येणार आहे. परंतु, श्रेणीसुधारणेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 आणि मार्च 2021 अशा दोनच संधी मिळणार आहे.