Mon. Jan 25th, 2021

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक!

अखेर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलंय. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घोषणा केली असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

महाराष्ट्रात 288 जागांवर मतदान होणार आहे, तर हरियाणातील 90 जागांवर मतदान होईल.

महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 94 लाख उमेदवार आहेत.

महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.

21 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

 

उमेदवारांसाठी सूचना

गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना माहिती द्यावी लागेल

वृत्तपत्रात माहिती प्रकाशित करावी लागणार

सर्व उमेदवारांना खर्चाची माहिती 30  दिवसात द्यावी लागेल

28 लाखांपर्यंत खर्चाची मुभा देण्यात आली आहे.

उमेदवारी अर्जावरचा एकही कॉलम रिकामा राहिल्यास उमेदवारी रद्द होणार

प्रचारादरम्यान पर्यावरणपुरक साहित्याचा वापर करावा, असं आवाहन निवडणूक आयोगाने केलंय.

महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत असेल.

निवडणुकांसाठी महाराष्ट्रात दोन पर्यवेक्षक पाठवले जाणार

सहकारी बँकांवर विशेष नजर ठेवण्यात येणार आहे,

सर्व मतदार केंद्रावर CCTV व्यवस्था करणार

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात विशेष सुरक्षा पथक असेल.

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा असतील.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची  तारीख- 4 ऑक्टोबर

अर्ज पडताळणी- 5 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची तारीख- 7 ऑक्टोबर

मतदान – 21 ऑक्टोबर

मतमोजणी- 24 ऑक्टोबर

27 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *