महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्यास सुरुवात – मुख्यमंत्री

येत्या महिन्याभरात विधानसभा निवडणूक ठेपली असून सर्व राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले आहे. अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे.
कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे उद्योगांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्यास सुरुवात होईल.
कंपन्यांची परिस्थिती सुधारेल; बाजारात मागणी येणार आहे.
महाराष्ट्र देशातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट हब म्हणून ओळखलं जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे आभार मानले आहे.
अमेरिका आणि चीन मध्ये मोठा ट्रेड वॉर सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
रेपो रेट कमी करण्याचा ग्राहकाला फायदा झाला.
बँकाच्या विलीनीकरणाच्या निर्णयाच स्वागत केले.
45 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर सुट देणाचा निर्णयाचा फायदा होणार.
जीएसटीच्या नव्या रचनेमुळे हॉटेल इंडस्ट्रीला मोठा फायदा होणार.