Wed. May 18th, 2022

‘महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’ – फडणवीस

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. किराणा दुकानात वाईन मिळण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय दारुड्यांच्या फायद्याचा असल्याची टीका, भाजपने केली आहे.

गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मविआच्या या निर्णयावर विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त. दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नवीन दारू विक्री परवाने देण्याचा निर्णय. आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. त्यामुळे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, असे फडणवीस म्हणाले.

तसेच ते म्हणाले, शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. मात्र सरकारचे प्राधान्य केवळ दारूलाच असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे. तसेच सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

1 thought on “‘महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’ – फडणवीस

  1. What youre saying is completely true. I know that everybody must say the same thing, but I just think that you put it in a way that everyone can understand. I also love the images you put in here. They fit so well with what youre trying to say. Im sure youll reach so many people with what youve got to say.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.