Thu. Feb 25th, 2021

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाशरद पोर्टल’,’ई-बार्टी’ ॲप होणार लाँच

Mahasharad Portal will be launch on sharad pawars birthday

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: शरद पवार यांचा उद्या (१२ डिसेंबर) ८० वा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी महाशरद नावाचे पोर्टल आणि विविध योजनांच्या माहितीसाठी पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून ई-बार्टी नावाचे ॲप लाँच केले जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


दिव्यांग व्यक्तीसाठी महाशरद हा डिजीटल प्लॅटफार्म योजना सुरू करणार-
-राज्यात दिव्यांगांचे २१ प्रकार नमूद केले आहेत.
-विविध प्रकारची ३० उपकरणे उप‍लब्ध करून देण्यास मदत
-दिव्यांग व्यक्ती आणि दाते यांना जोडण्याचे काम यामार्फत होणार
-दिव्यांग व्यक्ती यावर आपली नोंदणी करतील, दानशूरही आपली नोंद करून ते आपली मदत उपलब्ध करून देतील.


राज्यात सुमारे २९ लाख दिव्यांग व्यक्ती आहेत. या पोर्टलवर एकदा नोंदणी झाल्यास त्याचा तपशील दिला तर त्याची तपासणी दानशूरांना करता येणार आहे. शिवाय सामाजिक न्याय विभागही करणार आहे. सध्या हे वेबबेस पोर्टल असून मार्च २१ नंतर हे ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. महाशरद हे पोर्टल उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सुरू केले जाणार आहे.


ई-बार्टी ॲप


पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून ई-बार्टी नावाचे ॲप लाँच केले जाणार


-स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती आदी अनेक बाबींचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे. यावर ईक्लासरूम
-स्पर्धा परीक्षांचे नोट्स, ईलायब्ररी, अहवाल, सामाजिक न्याय विभागाचे साहित्य, समाजसुधारकांचे साहित्य, विचार यात उपलब्ध केले जाणार आहे.
-जातवैधता पडताळणी माहिती या अॅपमार्फत करता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *