Thu. Apr 22nd, 2021

प्रदर्शनातून उलगडतंय महात्मा गांधींचे स्वच्छता मिशन

वर्धा : महात्मा गांधींच्या जीवनपटावर मल्टिमीडिया चित्र-प्रदर्शनीला वर्ध्यात सुरूवत झाली आहे. या प्रदर्शनीत महात्मा गांधींच्या कार्याला स्वच्छता मिशनचीही जोड देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. या प्रदर्शनासाठी राज्यातील वर्ध्याची निवड करण्यात आली आहे.

लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात ही प्रदर्शनी सुरु आहे. या प्रदर्शनीमुळे महात्मा गांधींच्या जीवनातील विविध पैलूंची ओळख होतेय. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधी समजून घेण्यासाठी ही पर्वणीच ठरली आहे.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त या प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा गांधींचं जीवनपट या डिजिटल प्रदर्शनीतून उलगडलं जातय. सोबतच महात्मा गांधींचे स्वच्छतेचे कार्य या प्रदर्शनीतून समाजासमोर मांडले जात आहे.

विविध शाळेतील विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देत आहेत. महात्मा गांधींचे स्वातंत्र्य काळातील आंदोलने, चले जाव चळवळ , मिठाचा सत्याग्रह तसेच महात्मा गांधींची तत्व डिजिटल माध्यमाचा वापर करून प्रदर्शनात मांडली आहेत.

टच स्क्रिन, डिजिटल फ्लिप बुक, मिनी थेटर, बायोस्कोप, एअर गेम, सेल्फी कॉर्नर, बुक शेल्फ, आदी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला.

देशात २१ ठिकाणी या प्रकारचे प्रदर्शन होत आहेत. महाराष्ट्रातील वर्ध्यात आजपासून प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन ९ डिसेंबरपर्यंत सूरु असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *