Mon. Jan 17th, 2022

‘या’ दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले

पालकमंत्र्याच्या नियुकत्यांमध्ये अशंत: बदल करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ट्वविटरच्या अधिकृत खात्यावरुन देण्यात आली आहे.

सतेज पाटील यांना पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जबाबदारी बदलून देण्यात आली आहे. सतेज पाटील यांना भंडाराऐवजी कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात आली आहे.

या बदलाआधी कोल्हापुरच्या पालकमंत्री पदाची जबाबादारी ही बाळासाहेब थोरातांकडे होती.

तर विश्वजीत कदम यांची नव्याने भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची ८ जानेवारीला जिल्हानिहाय पालकमंत्री पदी नेमणूक करण्यात आली होती.

दरम्यान श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबादारी देण्यात आल्याने रायगडमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

रायगड जिल्ह्यतून शिवसेनेचे ३ आमदार असून देखील राष्ट्रवादीला पालकमंत्री पद दिल्याने रायगडमधील शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *