Fri. Jan 21st, 2022

महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप

महाविकासआघाडीच्या 36 आमदारांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता महाविकासआघाडीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांना अ-6 बंगला देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना देवगिरी बंगला देण्यात आला आहे. तर अशोक चव्हाण यांना मघदूत बंगला दिला आहे.

तसेच दिलीप वळसे पाटलांना शिवगिरी तर अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी बंगला मिळाला आहे. राजेश टोपे यांना जेतवन बंगला दिला आहे.

कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना दालन वाटप, ‘या’ मंत्र्यांवर अन्याय

राजेंद्र शिंगणे आता सातपुडा बंगल्यात वास्तव्य करणार आहेत.

धनंजय मुंडे यांना अ-9 हा बंगला देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी विधानपरिषद विरोधीपक्षनेता प्रवीण दरेकर यांना अ-9 बंगला देण्यात आला होता.

तर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना याआधीच सागर बंगला दिला होता.

28 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह आणखी 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर या मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले होते.

यामध्ये छगन भुजबळांना रामटेक, जयंत पाटलांना सेवासदन बंगला देण्यात आला होता. तर गृहमंत्री एकनाथ शिंदेंना रॉयलस्टोन बंगला वितरीत केला गेला होता.

दरम्यान अजूनही महाविकासआघाडी सरकारचे खातेवाटप करण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *