Sat. Jan 22nd, 2022

‘महाविकास आघाडी म्हणजेच मिनी यूपीए’ – संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ‘महाविकास आघाडी म्हणजेच मिनी यूपीए’ असे महत्त्वपूर्ण विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश आणि गोव्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला साथ द्यायची किंवा नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी आहे.

एकमेकांच्या मदतीने समान नागरी कायद्यावर आम्ही सरकार चालवत आहोत आणि सरकार उत्तम चालत आहे, असा दावाही राऊतांनी केला आहे. सरकार सुरळीत चालण्यासाठी सत्ताधारी पक्षनेते वेळोवेळी बैठकी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोव्यामध्ये शिवसेना कोणासोबत निवडणूक लढणार आहे? यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. शिवसेनेने आघाडीसोबत निवडणूक लढवायची किंवा स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *