Wed. Aug 10th, 2022

‘मविआला चिंता गांजा आणि खंडणी वसुलीची’ – देवेंद्र फडणवीस

 भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. महाविकास आघाडीला गांजा आणि खंडणी वसुलीची चिंता असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी मविआवर हल्लाबोल केला आहे.

  फडणवीस म्हणाले, राज्यावर विश्वासार्हतेचे संकट आले आहे. मात्र या संकटात राज्यसरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो आणि या सर्वामध्ये जनतेचे हाल होत आहेत. तसेच राज्य सरकार हे कायद्याचे राज्य राहिले नाही तर ‘काय दे’चे राज्य झाले आहे. सत्ताधाऱ्यांची वाटमारी चालली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच या सर्वामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.

  राज्यातील नेत्यांचे दहशतवाद्यांसोबत व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे आता विचारांचा नक्षलवाद राहिला नसून आता तो दहशतवाद्यांशी निगडीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यानीं सांगितले. राज्यात मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, राज्यात हे काय सुरू आहे. सरकारमध्ये शक्ती, युक्ती कायदा राहिला नसून केवळ भक्ती उपक्रम चालू आहे. केंद्र सरकारने इंधनावर कर कमी केले. त्यानंतर २५ राज्यांनी व्हॅट कमी केला. मात्र महाराष्ट्र सरकारने व्हॅट कमी केला नाही, असे फडमवीसांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा टोला ही फडणवीसांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.