Mon. Feb 24th, 2020

धोनीचा गाणी गातानाचा व्हिडियो व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी नेहमीच चर्चेत असतो. धोनी क्रिकेटव्यतिरिक्त अनेक एक्टिव्हिटी करत असतो. धोनीचं गाडी-बाईक प्रेम जगजाहीर आहे.

तसेच धोनीला गाण्याची देखील आवड आहे. धोनीने याआधी अनेकदा गाताना पाहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या धोनीचा गाणी गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘जब कोई बात बिघड जाये’, हे गाणं गातानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. प्रिती सिमोन्स या इंस्टा अकाऊंटवरुन धोनीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

धोनी गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. धोनी आपली अखेरची मॅच न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. वर्ल्ड कपमधील सेमी फायनलची ही मॅच होती.

दरम्यान क्रिकेट वर्तुळात धोनीच्या निवृत्तीबद्दल उलटसुलट चर्चा आहे. क्रिकेटमधील कमबॅकबद्दल येत्या जानेवारी पर्यंत बोलणार नसल्याचं धोनीनें सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *