Fri. Jan 28th, 2022

२५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना दिला जन्म

आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे. ही महिला २५ वर्षीय असून मोरक्को येथील आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे. तसेच एकाच वेळी या महिलेने नऊ बाळांना जन्म कसा दिला यासंदर्भातील संशोधन आणि इतर माहिती अद्याप सरकारला मिळाली नाही आहे. असं एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. माली सरकारने २५ वर्षीय हालीमा सिसी या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळावल्यात म्हणून पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयामध्ये ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म देणं दुर्मिळ घटना आहे. मोरक्कोचे आरोग्यमंत्री रिचर्ड कोऊधारी यांनी आपल्याला या प्रकरणासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमध्ये या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. “ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे,” असं मालीच्या आरोग्यमंत्री असणाऱ्या फॅण्टा सीबे यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं आहे. या महिलेसोबत गेलेल्या मालीमधील डॉक्टरांकडून आपण तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती घेत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. काही आठवड्यांनंतर ही महिला आणि बाळं मायदेशी परततील असं सांगण्यात आलं आहे. डॉक्टर हालीमाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहे. शिवाय या मुलांच्या प्रकृतीवरही डॉक्टर बारीक नजर ठेऊन आहेत. ही सर्व बाळं वाचतील की नाही यासंदर्भात नंतर कळेल तसेच माली आणि मोरक्कोमध्ये करण्यात आलेल्या अल्ट्रासाऊण्ड चाचण्यामध्ये या महिलेच्या पोटात सात गर्भ आढळून आल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी हालीमाचं अभिनंदन करत डॉक्टरांचंही कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *