Mon. Jul 6th, 2020

माळशेज घाटात दरड कोसळली, नगर – कल्याण वाहतुकीला फटका

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली. खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पुर्णतः थांबविण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी   कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले आहेत.

घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

पहाटे दोन वाजता माळशेज घाटात दरड कोसळल्याने आयशर  टेम्पो पूर्ण  ढिगाऱ्याखाली अडकला असून टेम्पो चालक अमोल दहिफळे रा. मोहटादेवी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर गंभीर जखमी असून त्याला मदतीसाठी ओतुर 108 तत्काळ घटनास्थळी दाखल डॉ सचिन खेडकर व पायलेट गणेश गायकर यांनी प्रथमो उपचार करून पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले.

मुरबाड-म्हसा मार्गे पुण्याकडे व किनवली मार्गे नाशिक अशी वळवण्यात आली आहे, टोकावडे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *